प्रवास

प्रवास

उघड्या मेंदूच्या डोळस माणसांना
काही प्रश्न रात्रीच्या उजेडात 

आणि दिवसाच्या अंधारात छळतात..!
तेव्हा कुठे माणसाला
इथली माणसं कळतात..!!

कलम उचलून,बोट उचललं नाही तर 
उद्याची पिढी 
कलम उचलनाऱ्या बोटांवर उचलेल बोट..!
बोथट होऊन जिवंतपणी तिरडीवर जाण्यापेक्षा
एकदा घेऊनच टाकू 
मुर्दाड व्यवस्थेच्या नरडीचा घोट..!!

चुकनाऱ्यांच्या चुकांवर टीका करणं
चूक नाही...,आता छातीठोकपणे 
अंधाराच्या छाताडावर चढावं लागेल..!
अशी कोणतीच उंची गाठू नये कोणी
ज्या उंचीवर चढण्यासाठी 
स्वतःच्या नजरेतून स्वतःला पडावं लागेल...!!

पुढच्याने मागच्याला द्यावा हात..!
आणि मागच्याने त्याच्या मागच्याला द्यावी साथ..!!
शेवटी हातात हात घालूनच होतो प्रवास..
आयुष्याचा असो नाहीतर साहित्याचा..

Post a Comment

0 Comments