अधुरी एक प्रेमकहाणी (incomplet love story marathi poem)

अधुरी एक प्रेमकहाणी

एक वडाचा पार होता 

एक पिंपळझाड होतं 
गावापासून दूर थोडं 
शाळेपासून जवळ होतं 
जमायची पोरी पोरं 
खेळायची शिवनापाणी 
लपाछपी सुरपारंब्या 
घ्यायची तोर्यात झोका 
साधून मोका 
आणि बरच काही घडायच 
न समजनार्या पण कळत्या वयात 
ती माझ्या नि मी तिच्या प्रेमात 
तिथेच घेतल्या शपथा 
रंगवली स्वप्न लिहील्या कविता 
मोजल्या आकाशातल्या चांदन्या 
वेचल्या पावसातल्या गारा 
गायली पाखरांसोबत गाणी 
मी झालो होतो दिवाना 
ती झाली होती दिवानी 
मी पिंपळव्रुक्षाखाली 
ती पारावरली परी 
मी प्रेमाच्या शोधात 
ती प्रेमात हारवलेली.........

या युद्धाच्या रणांगणात 

तह न झालेली 
अंधाराने गिळलेली 
सैल मिठी झालेली 
चंद्र तार्यांनी पाहीली होती 
अधुरी एक प्रेम कहाणी........

मान्य आहे ती ती होती 

मी मी होतो 
ती मला नि मी तिला 
तसा नवा नव्हतो 
मग माझ्या ठिगळ जोडलेल्या शर्टाकडे पाहून 
तिच्या मयुरी डोळ्यात 
का उसवत गेले धागे.... ?

वासनेचा उत्सव साजरा करत 

जिचे मोरपीस मी काळजात जपले 
मधुबनात आज धुके दाटले 
आभाळ फाटले......
जिंदगी सर्कस झाली माझी 
आयुष्य सरकत गेले मागे......

त्या पिंपळव्रक्षाखाली 

मी आजही प्रेमाच्या शोधात 
ती प्रेमात हरवलेली 
तिच्या शहरात....

तिच्या शहरात.... 

असेल का... असेल का... 
एखादे वडाचे झाड निदान 
तिच्या शहरात....

तिच्या शहरात....

असेल का... असेल का... 
एखादा वडाचा पार किमान 
तिच्या शहरात...

तिच्या शहरात... 

असेल का... असेल का... 
एखादी पिंपळछाया महान 
तिच्या शहरात...

तिच्या शहरात...

कुठे कुठेच नसेल 
कदाचित घुटमळत असेल 
मी दिलेलं पिंपळपान 
तिच्या दारात...... 
म्हणून तर ती येत असेल 
माझ्या गावात.....

सनासुदीला, संक्रातीला,पंचमीला 

नाग नसलेलं वारुळ पुजायला 
पण ती येते मला दिसते, भेटते 
माझ्याशी भरभरुन बोलते 
जुन्या आठवणी जागवते 
तिच्यावर लिहीलेल्या कविता गुणगुणते

मला म्हणते 

तू कवी ना 
मी मीराची विना 
ऐकवना ऐकवना 
एखादी राधाकृष्णावर कविता.......

मी म्हणतो 

मी बदललोय पुरता 
पटणार नाही तुला 
राधा वनात बावरली 
मीरा वाळवंटात हरवली 
रुक्मिणी खोप्यात झुरली 
बासरी गोपीकांच्या उरात रुतली 
सांग मला 
त्यांची वस्त्र कुणी चोरली....?
त्यांना विवस्त्र कुणी पाहीलं...?

ती म्हणाली....

खबरदार....!
तुला काय पडलं...... ? 
हा माज नाही नाज आहे 
याद राख......! 
गर्व से कहो...... 
मी ती आहे.....
मी.. शिख,मुस्लिम, ईसाई नाही 
तू कोण...?

मी.....?

तो ही नाही 
मी हा ही नाही 
मी तसाही नाही 
मी असाही नाही 
मानवतेचा गळा चिरनारा 
मी कसाई नाही.

ती चिडली,भडकली...... 

तू क्रिष्णाची निंदा करून 
युद्धाची भाषा बोलतो आहे 
नाही ग.......
उत्क्रांतीच्या जिवस्रुष्टीत 
तथागताला जानून घेताना 
बुद्धाची भाषा बोलतो आहे.

प्रिये... 

मला तरी कुठे अजिंठा वेरुळ होता आलं ?
मी वारुळ झालो आहे आता 
तुझ्या सहस्त्र हजार पटींच्या पटीत 
अनंत जिवांच जिवदान झालो आहे 
कुण्या क्रिष्णाच्या माथ्यावरल्या नागाला 
प्रवेश नाही इथं 
हत्तीलाही मारुन टाकते एक मुंगी 
तो काय करणार तिथं ?

बाई झाल्याचा आव आणत 

ती मष्करीत बोलली 
किती बोलतोस रे माकड्या....

मी म्हणालो... 

तूझा लपवून ठेव चेहरा 
ग्यालीलीओ ऑईनस्टाईन माहीत नाही तुला 
एडीसन अंधारात प्रकाश देऊन गेला 
अलेक्झांडर आज ही बोलतोच आहे 
स्टिफन हॉकिंगन इश्वर नाकारला 
डार्विनचा सिद्धांत समजून घे जरा 
माकडा पासूनच मानसाचा प्रवास सुरु झाला

म्हणाली.....

येवढं शहाणपण कुठून आलं तुला ? 
चल आता 
लय झालं 
अंधार पडलाय 
उशीर झालाय 
मी जाते 
तू जा....

मी म्हणालो 

थांब थोडं 
ऐक जरा.....

सुर्याचा जन्म पिंपळव्रुक्षातून झाला 

की पिंपळाचा जन्म सुर्यकिरणांतून झाला 
वेडे............. 
हे वार्यालाही न सुटलेले कोडे आहे.

जिथे बोधी प्राप्त झाली गौतमाला 

आणि वाचा फुटली विन्यानाला 
हे ते वडाचं झाड नाही 
हा तो वडाचा पार नाही. 
हा पिंपळव्रुक्ष आहे 
हे म्रुत्यूचे द्वार नाही......

हा बोधिव्रुक्ष आहे.....

जो दिवसा आणि रात्री ही 
ऑक्सिजन देतो माणवाला

त्या पिंपळव्रुक्षाखाली.....
तह न झालेली अंधाराने गिळलेली 

सैल मिठी झालेली 
चंद्रतार्यांनी पाहीली आहे 
तुझी माझी 
अधुरी एक प्रेमकहाणी....

समाप्त.

पुरंदर,पुणे.
📞9922282038


Post a Comment

1 Comments