गारवा

गारवा
डोक्यावरती तळपता सूर्य
आणि खांद्यावरती मला घेऊन..
अनवाणी पायानं 
माझा बाप मातीचा विस्तव 
तुडवीत चालायचा..
आणि हसत हसत बोलायचा
बेटा डोकं तापतय,
डोक्यावर फडकं टाक...
हाताच्या फोडासाठी 
पायाच्या तळव्याला 
आलेल्या फोडाकडं
किती सहज करायचा डोळेझाक ....
फक्त अनवाणी पायालाच
चटके बसायचे,
हृदयात मात्र विस्तव फुल व्हायचा...
कारण खांद्यावरून
बापाच्या पायात पडणाऱ्या
माझ्या सावलीत 
बाप भविष्याचा "गारवा" शोधायचा..

९५ ०३ ०६ ०५ ४८

Post a Comment

0 Comments