हुरूप

हुरूप


मांजरीचे दात आता,लागू लागले पिलांना.
गुलाबाचे काटं आता,टोचू लागले फुलांना..

लेकराला लावी जीव,खुणी नाही कोणी बाप,
खरी जात आहे खुणी,तिला धर्माचा शाप...

जीवा पल्याड जपले,त्यांनी सपासप कापले,
असे वागतात कसे,जे असतात आपले..

जन्म दिला लेकराला, तुम्ही गुलामाला नाही..
मूल्य आहे दागिन्यांला,त्याच्या मुलामाला नाही..

छेडणारा चालतो कपडे काढणारा चालतो,
घरामधी इज्जतीला हात घालणारा चालतो..

साथ देनाऱ्याचा आता,केला जातो आहे घात..
मान सन्मानाच्या बाता,मोठी झाली आहे जात..

काटा तोचला तरीही,बाप फोडायचा टाहो..
जीव लावणाऱ्यांनी, कसा जीव घेतला हो..

तळ हाताचा तो फोड,किती केले होते लाड..
स्वप्नांच्या डोक्यामधी,घाली गर्वाची कुर्हाड..

प्रेम आहे मानवता,त्याला म्हणू नये पाप..
बापानेही बाप व्हावे,आता होऊ नये साप..

सलतो जातीचा काटा,देशाच्या पायाला कुरूप..
काटा काढणाऱ्याला,चला देऊ या हुरूप..
चला देऊ या हुरूप..Post a Comment

0 Comments