मी मीच आहे

मी...मीच आहे..

यमक जुळले,

की आशय सापडत नाही..
आशय सापडला,
की यमक जुळत नाही..
हे असं तेव्हाच होतं
जेव्हा मला तुझ्यासाठी
खरं लिहायचं असतं..लिहिलेलं मला पटत नाही
आणि जे मला पटतं
ते मला लिहिता येत नाही..
हे असं तेव्हाच होतं
जेव्हा मला त्यांच्यासाठी 
बरं लिहायचं असतं..


मला नेहमी खरं लिहायचं असतं
म्हणून मी कोणत्या
बंधनात अडकत नाही..
आणि मला बरं लिहायचं नसत,
म्हणून मी स्वतःला 
कोणाच्या दावणीला बांधून घेत नाही..
मी....मीच आहे....

लेखक ...सुमित गुणवंत...

Post a Comment

0 Comments