Marathi kavita


Marathi kavita

प्रस्थापितांनो,
शेट्ट उपट्यांनो,,
अजून किती करणार 
स्वतःच्या नावाचा गाजावाजा..!
आणि गावभर हिंडणार 

खोटे कापडं घालून
जसा हिंडला होता भोंगळा राजा..!!
अरे द्या सोडून,
मारुद्या ना त्याला ही मुसंडी 
करा ना एकदाचा सैल...!
प्रसिद्धीच्या दावणीला 
बांधलेला तुमच्यातला सत्याचा बैल..!!
अनेकांच्या शब्दात मला
दिसतो नवा नामदेव,
पण जगण्यात पँथर दिसत नाही..!
म्हणून पुरस्काराच्या यादीतले
सगळेच माझ्या नजरेत बसत नाही..!!
बाटल्यांसाठी एकमेकांच्या
खोट्या सन्मानाच्या ताटल्या
वाजवनाऱ्यांना फक्त तहान आसते
भूक नाही..!
म्हणून माझ्या विचारात ओवी असताना
माझ्या कवितेत शिवी येते
त्यात माझी चूक नाही.. !!
विचारांची दुर्गंधी पसरावणाऱ्यांच्या 
शब्दांना येत नसतो,
क्रांतीच्या फुलांचा सुगंध..!
मला कोणीही ढसाळांचा संदर्भ देऊ नका
अजून मी जाहीर केला नाही
आमच्या खानदानीचा संबंध..!!


( टीप:-प्रस्थापित हा शब्द व्यक्तिगत नसून हा शब्द सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक,राजकीय,वृत्तीला अनुसरून आहे )

लेखक ...सुमित गुणवंत...
Post a Comment

0 Comments