Marathi kavita

शृंगारिक कवितेने,
सौंदर्यात 
भर पडली असती,

तुझ्या गालावरली लाली
वर चढली असती..,


भुकेच्या कवितेने
पोट भरलं असतं,
आयुष्य कसं,
मजेमजेत सरलं असतं..


कवितेतेली झोपडी 
तुला वाटली असती महाल..
कवितेतल्या श्रीमंती पुढं
कुबेर झाला असता कंगाल..


स्वप्न सुद्धा सत्य
तुला वाटून गेलं असतं..
माझ्या ओळींच महत्व
तुला पटून गेलं असतं..


हे सारं काही मनासारखं 
एकाएकी घडलं असतं..
तुझं प्रेम जीवापाड
माझ्यावरती जडलं असतं...

पण जशा मी केल्या
तुझ्यासाठी तुझ्यावर कविता.., 

तसा केला असता जर
तुझ्या नावावर.....
एखादा गुंठा...
Marathi kavita

लेखक ...सुमित गुणवंत...
Post a Comment

0 Comments