कन्यादान

कन्यादान

मी तुला म्हणायचो सोन्या काय करतोस,,,?

तू उत्तर देण्या आधी माझ्याकडं बघायचीस,,,
आणि संमोहित होऊन जायचीस,,,
माझ्या कमकुवत स्वप्नामध्ये,,,

आणि तू स्वतःला सोपवून द्यायचीस,,,

माझ्यावर बिनधास्तपणे,,,

तुझ्या त्या बिनधास्तपणे सोपवण्याने माझ्या कमकुवत स्वप्नांना कुणास ठाऊक इतकं कुठून बळ मिळायचं,

कि माझ्याकडं जणू जादूची कांडी आहे,,
फिरवली कि सार काही ठीक होईल हेच उत्तर मिळायचं,,,?

पण जेव्हा तू म्हणालीस,,

कि माझे बाबा हि मला सोन्या काय करतोस,,
असच म्हणतात,,
तूझा आवाज ऐकला
कि मला त्यांनीच आवाज दिला अस वाटतंय....
आणि बघ तुझ्या ह्या बोलण्यानं
माझ्या काळजात बाप नावाचं महाकाव्य साठतंय...

काय बोललीस गं तू,

अन बघ कसा स्वतःचा तराजू करून ठेवलास 
स्वतःला फसवून,,
एका पारड्यात मला अन दुसऱ्या पारड्यात तुझ्या बाबांना बसवून,,

आयुष्यभर तू हाच प्रयत्न करत राहिलीस,,

एक पारडं दुसऱ्या पारड्यापेक्षा जड होऊ नये,,
तराजू ची मोडतोड झाली तर तर झाली,
तडजोड करूनही मोजणं अवघड होऊ नये,,

कुठून आणलं ग एवढं सारं शहाणपण,,

जे पारडं हलकं होईल तिकडं झुकण्याच मोठ्ठ मन,,

बस झालं आता तराजू सारख अधांतरी लटकणं,,

माहित नसलेल्या वाटेवर अंधारात भटकणं,,

आता नको मोजूस कुणाला हि,,

फक्त काळजाचा आवाज ऐक आणि मनाचा कौल दे,,
नाहीतर आयुष्यभर केलेली दोरीवरची कसरत फोल ठरेल,,,

खरंच गं मी तुला तुझ्या बाबांन सारखंच जपलं..

अगदी एखाद्या लहान मुली सारखंच,,
तुझे सारे रुसवे फुगवे,तुझे सारे सारे जगावेगळे हट्ट
अजून हि सोडता आली नाही ती तुझी मिठी घट्ट,,
मी म्हणायचो अगदी तशीच तू वागत गेलीस,
मी दाखवले तेच स्वप्न तू बघत गेलीस,,
हाताचा फोड,,पापा गोड,, चिऊताईचा घास,,
श्वासात श्वास,,
मस्ती मज्जा,,,गंमत जमतं,, विरहाची सज्जा,,
पाहिलं मी सारं मायेच आभाळ तुडुंब भरताना,,
डोळ्यात माझ्या एका मुलीवर बापावाणी माया जडताना,,

सार काही ठीक होत गं,, आयुष्य सार नेक होत गं,,

पण मधेच तू म्हणालीस माझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे कि,,त्यांना त्यांच्या मुलीचं त्यांच्या हातांनी त्यांच्या निवडीनं 'कन्यादान'
करायचंय,,
लग्नात तिच्या खूप मोठ्या मानानं मिरवायचंय,,

त्या बापाच्या इच्छेपाई ह्या बापाच्या डोळ्यात

विदाईचं सावट पसरायला लागलंय,,,
मी उगाच तुला पोरीसारखी जपली,,
माझ्यातली बापाची माया,
माझं तुझ्यावरच प्रेम विसरायला लागलंय,,

समजतंय गं मला बापाची माया कशी असते मुलीसाठी,,

जशी लाकडं राख होतात जाळून स्वतःला चुलीसाठी...

तू बोलूच नको कोणत्याही बाजूनं 

फक्त स्वतः जळत राहा अन पहा मलाही जळताना,,,
तुझ्या मंडपातून माझी पाऊले स्मशानात वळताना,,
पण घाबरू नकोस मी हरणार नाही
इतक्यात लाकडांवर जळणार नाही
तूच तर शिकवलंय मला मोठं मन करून राहायला,,,
हुंदका दाबून स्वतःच्या आगीत स्वतःलाच जळताना पाहायला,,

आता मी हि होईल तुझ्यासारखाच तराजू,,,

एका पारड्यात माझ मरणं,,
अन दुसऱ्या पारड्यात तुझी आठवण,साठवित राहील,,,
वेळोवेळी न चुकता मोजमाप
तुला ओल्या डोळ्यांनी पाठवीत जाईल,,,

त्या "कन्यादाना" आधी इथं काळजाच्या मंडपात आठवणीच्या साक्षीनं होईल तुझं मस्त "कन्यादान"
समर्पण बिमर्पण काही नाही गं फक्त ख़ुशी खुशीत....

तू दिल्या घरी सुखी आहेस,,
त्या हि अन ह्या हि बापाला फक्त खोटं खोटं 
"समाधान" 
?
९५०३०६०५४८

Post a Comment

0 Comments