marathi kavita

#जर_मी_तुझ्या_आधी_मेलो_तर...

#ये_आदीमाय_माते....!!
स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत 
देहाची तिरडी सजून 
म्रुत्यूच्या दारावर पडेल थाप जेव्हा...
दूर कुठे नेहून खड्ड्यात गाडून टाक मला 
अथवा जाळून टाक मला 
जर मी तुझ्या आधी मेलो तर.............

तू माझी पत्नी होतीस 
आणि मी तुझा.... कुणीही नव्हतो.. 
हे असे बिंधास्त विधान करताना 
बाईची जात समजून मनाला उगीच 
लावून घेवू नकोस तू 
तूझं नवं आयुष्य जगताना 
साजोगपणाच्या बाता मारु देत त्यांना 
सती सावित्रीचे गोडवे गावू देत त्यांना 
जख्मी फुलांना पाहून 
झुरु आणि मरु नकोस तू 
तूझं नवं आयुष्य पेटताना 
भाळावर नवा सूर्य गोंदवून घे 
जर मी तुझ्या आधी मेलो तर..........

आसवं आवरीत माघारी फिरलेलं गोत्र 
वस्त्र उतरून शरीर फाडणारी पहिली रात्र 
हळदीच्या पावलांनी हरवलेलं बालपण 
विवाहाच्या भरजरी शालूत गुंडाळून 
किती दिवस ठेवनार तू ? 
वासना जी मारुनही मरत नाही 
कितीही भोगली मन भरत नाही 
तिथं चार भिंतीच्या आत कोंडून 
भावनांचा खेळ मांडून 
रडीचा डाव किती दिवस खेळणार तू ? 
हवं तर सटवीच्या पाचविला मार ठोकर 
जर मी तुझ्या आधी मेलो तर......

तू असताना, नसताना.......... 
मादी एक प्रयोगशाळा समजून 
मी केलेल्या अनैतिक व्यभिचाराची रासलीला 
समस्त स्रीमुक्तीसाठी वेबसाईट कर 
अस्तिनीतल्या सापांनी घेतलाय चावा 
मांजरीच्या गळ्यात कुणी बांधावी घंटा 
कसा पोखरावा डोंगर....
कसा सोडवावा गुंता.....
रंडी सोबत केलेली शय्यत नसते खरी 
ही संस्कृती समज की वाटू दे विक्रुती 
दोन्हीही बिसाईट कर 
अन तुझ्या बरबाद पिढ्यांचा बदला घे 
जर मी तुझ्या आधी मेलो तर......

आगं तू साधी दारात उभी 
बाजारात गेलीस तरी 
कुणाशी बोललीस तरी 
माझी संशयी नजर तुझ्या मागावरी 
ही पुरुषी अहंकाराची मक्तेदारी, मिजासखोरी मोडून 
या स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत 
तू अशी मदमस्त बाहेर ये 
सखे.......
सुख शोधण्यात सडून जाते जिंदगी ज्यांची 
मेकअपवारी संपून जाते कमाई ज्यांची 
याहून वेगळी काय असते पुरुषाची अंतीम अवस्था 
हेही थोडं समजून घे 
तू तर नव्या नवर्याला जन्म देतेस 
भरल्या विश्वाला अर्थ देतेस 
पुरुषाची जात किती निच असते 
याची जाहीर कबुली देताना 
जमल्यास याही नराधमाला शिक्षा कर 
जमल्यास एका पराभूताला माफ कर 
ये अदिमाय माते......... 
तुझ्या बिजांकुराला क्षमा कर 
जर. मी. तुझ्या. आधी. मेलो. तर......
#जर_मी_तुझ्या_आधी_मेलो_तर.....

समाप्त.........
.....पुणे.....
99 22 28 20 38

Post a Comment

0 Comments