चित्र × कविता...

चित्र × कविता...


आमच्यात अस काही विशेष नव्हतं

आम्ही फक्त होतो मित्र...
तिला माझी कविता आवडायची 
मला अवडायचे तिचे चित्रं..


ती माझ्या कवितेवर चित्र काढायची,
अन मी तिच्या चित्रावर कविता करायचो...
दोघांना कधी हि कळायचंच नाही,
आम्ही एकमेकांच्या
थेट काळजात न बोलता शिरायचो....

तिला ओढ माझ्या कवितेची,
अन मला ओढ तिच्या चित्रांची,,
ती,मी,माझी कविता अन तिचे चित्र
एवढीच कथा ह्या चार मित्रांची...

ती माझ्या कवितेला 
रंग भरायची तिच्या हातांनी ,,,
अन मी तिच्या चित्रांना
जिवंत करायचो माझ्या शब्दांनी,,,
कसे पेटले होते आमच्यातच रान,
आमच्यातल्या शीतयुद्धानी...

ती बोलायची सारं काही चित्रांतून,,
अन माझ्यापुढं व्यक्त व्हायची...
माझी कविताही कमी नव्हती,
सारी काळजातली आग मुक्त व्हायची...

काळजातचं आमच्या भरायचं 
काळजीनं काव्यचित्र संमेलन..
अध्यक्ष पदासाठी नेहमी,
चित्रांचच असायचं आंदोलन..

मग मी हि माझ्या कवितेला गुपचूप
थोडासा धीरानी थांब म्हणायचो..
इतक्यात नको करू घाई,
आपला प्रवास लांब म्हणायचो...

चित्राला कवितेची,कवितेला चित्रांची 
सवयच इतकी झाली
कि कविताच रंगून गेली चित्रांच्या रंगात..
आणि चित्रांमधी कविता
हृदय बनून धडधडू लागली तिच्या अंगात...

माझं चंचल कवी मन
फक्त तिच्या चित्रातच बंदीस्त झालं...
आणि तीच मुक्त चित्र
माझ्या कवितेतचं व्यस्त झालं...

तिच्या आणि माझ्या आधी,
पानापनात गाजू लागली..
कला लागली कलेच्या नादी,
कानाकानात वाजू लागली...

माझी ओळख झाली माझी कविता
अन तिची ओळख झाली तिचे चित्र..
ह्या साहित्याच्या व्यापारात सुद्धा 
आमच नातं होतं तसचं राहील पवित्र...

ती चित्रकार बनली,
मी कवी झालो नावाजलेला...
कसा दाखवू मी माझा हात
तिच्या चित्रांनी भाजलेला...

आता ती चित्र काढतेय 
त्या रंगांनी जे रंग माझ्या कवितेला दिसत नाही,,
अन मी हि कविता लिहतो त्या विषयावर
जे विषय तिच्या चित्रात बसत नाही...

नेमकं झालं काय समजायला तयार नाही
तिच्या चित्राला भेटली दुसरी कविता 
कि माझ्या कवितेला भेटले दुसरे चित्र..
खरंच...तीच माझं
आयुष्य म्हणजे कोडचं, न सुटणार विचित्र....

ऐकलंय मी एवढ्यात 
म्हणे ती हि कविता लिहायला लागलीस..
अरे बाप रे म्हणजे तीला हृदयाशी बोलता येऊ लागलं....?
आता समजेल तीला कोण कुणाशी कस वागलं..

माझा हि कलम कधी कधी वाट चुकतोच..
कोरा कागद दिसला कि चित्र रेखाटायला लागतोच...
पण पोटाची भूक पुन्हा ती चूक करू देत नाही....
तिचा चेहरा काळजातच राहतो,
पुन्हा कागदावर येऊ देत नाही...

काळजातली आग शमवण्यासाठी
पांढरा कागद काळा करतो..
आडव्या तिडव्या रेघा ओढून 
तिच्या आठवणी गोळा करतो....

डोळे उघडे करून पाहतो कागदाकडं
अर्ध्या पानावरती असते
कविता माझ्या अर्ध्या भाकरीची..
आणि अर्ध्या पानांवरती खाडाखोड असते,
माझ्या नौकरीची...

संपत नाही इथेच कहाणी,,
काळजात राहते एकचं टोचणी..
माझी कविता नाही करू शकली
माझ्या भाकरीचं स्वप्न साकार...
आणि तिचे चित्रं असतील हि सुंदर,
पण आमच्या भविष्याला नाही देऊ शकले आकार...
................................. नाही देऊ शकले आकार.....


९५ ०३ ०६ ०५ ४८

Post a Comment

0 Comments