Marathi poem


शब्दांचा खेळ करून,

भावनांशी खेळणं
माझ्या नैतिकतेला पटत नाही..
म्हणून माझी कविता,
खऱ्या माणसांना खोटी वाटत नाही..
सत्य ,वास्तव, समाजाचा 
मला चेहरा दिसतो
म्हणून मी फक्त त्याला दाखवतो 
माझ्या कवितेचा आरसा..!!
ज्यांच्या लेखणीवर,
सारा देश चालतो ना..
त्याच विचारांचा मी,सांगतो आहे वारसा...!! 
नसतील ही येत,
कदाचित माझ्या कवितेत
पानं,फुल,झाड झुडपं,निसर्ग,ती 
आणि प्रेमाची नाती..!
पण माझ्या कवितेत 
दरवळत असते 
सुगंध बनून माझ्या गावाकडची माती..!!
इफेक्ट देऊन बदलतो फोटोतला लूक,
तशीच बदलली असती पोटातली भूक...
तर भागलेल्या भुकेने,
लागलेल्या भुकेच्या पोटात
कधीच मारली नसती लाथ...
दिवसाच्या उजेडात,कवितेच्या पोटात
गरिबीचे कावळे ओरडले नसते,
आणि भुकेच्या अंधारात,
उपाशीच झोपली नसती रात...
खऱ्या कवितेला 
नको आता खोटा खोटा प्रतिसाद..
काळीज काढून देणाऱ्याला
हवी असते काळजातून दाद...

लेखक ...सुमित गुणवंत...
Post a Comment

0 Comments