marathi poem


टिकतात_सर्व_नाती_समजून_घेतल्याने
पुरुषात_हीच_शिकवण_बाईकडून_येते

व्वा...क्या बात है...
ऐकला तर हा फक्त गझलेचा शेर,,,
आणि हृदयात कोरला तर आयुष्य..

ह्या एकाच शेरासाठी संपूर्ण गझल...
#
गगनाकडून येते..धरतीकडून येते
चाहूल संकटांची..चोहीकडून येते

टिकतात सर्व नाती, समजून घेतल्याने
पुरुषात हीच शिकवण..बाईकडून येते

सोडून गाव आले शोधात भाकरीच्या
पण हाक प्रेमवेडी..मातीकडून येते

काहीच चूक नसता, सोशीक होत जाते
लेकीत सहनशक्ती..आईकडून येते

हृदयात राहणारे देतात घाव जेंव्हा
कळ काळजामधेही..डावीकडून येते

✍️ सुहासिनी विवेकरंजन देशमुख

Post a Comment

0 Comments