त्याग

त्याग

अस म्हणतात कि,
त्यागातच खरं प्रेम आहे,,,
पण मग नेहमी
प्रेमाचाच त्याग का करायचा,,,?

"त्यागातच खरं प्रेम आहे"
अस म्हणणं म्हणजे
आपणच आपल्या तिरडीला
खांदा दिल्या सारख आहे,,,
"समर्पण"
खूप महान असल्यासारखं वाटतं,,
मी करतो "समर्पण",,
पण,
तू त्याग कर,,,
त्या परंपरेचा
ज्या परंपरेने तुझा हक्क नाकारला..?
अन त्याग करायचाच झाला तर
तुझ्यातील खोट्या अहंकाराचा कर,,
ज्यांनी तुला तुझ्या चौकटीतून
कधी बाहेर येऊ दिलचं नाही,,
चार भिंती मध्ये
तू जे कवटाळून बसली आहेस,,,
त्याचा हि त्याग कर,,
अन सगळ्यात महत्वाचं,,,
भविष्यात तुझ्या मनावर
होणाऱ्या समाजमान्य बलात्काराचा,,,
जमलचं तर तू "त्याग" कर...
अन माझी चिंता करू नकोस,,,
मी समर्पण तेव्हाच केलं होत,
जेव्हा तू नकळत माझी "जात"शोधत होतीस,,,,
अन त्यागास हि तयार होतो,
जेव्हा तू माझ्या भौवती
तुझ्या घरचांच्या अपेक्षांच्या
चार भिंती बांधत होतीस,,,,,,?
सुमित गुणवंत
९५ ०३ ०६ ०५ ४८

Post a Comment

0 Comments