marathi poem

ना कविता ना चारोळ्या नाही गझल,
मी तुला सरळ माझं हृदयचं टॅग करतो....

कधी तुझ्या प्रोफाइल मधी मी अचानक दिसेल,,
तर कधी तुझ्या इनबॉक्स मधी मी गुपचूप हसेल,,

तू कर कितीही हाईड मला,
मी तुझ्या हृदयाचं अकॉउंटच हॅक करतो.....

मी तुला सरळ माझं हृदयचं टॅग करतो....
तुझा बहाना डेटा नाही मी तर ऑफलाईन आहे,,
तुला समजेल कधी,मी तुझ्यासाठी ऑनलाइन आहे,

संपला तुझा डेटा,खोट्या तुझ्या नोटा,
अनलिमिटेड लाईफटाईम मी तुला नेट पॅक करतो,,,

ना कविता ना चारोळ्या नाही गझल,
मी तुला सरळ माझं हृदयचं टॅग करतो....

Post a Comment

0 Comments