google adsense

marathi poem

वांझ झालेली डोकी
जेव्हा विचार करतात
तेव्हा अन्याय, अत्याचारच पाझरतो.
दीड वर्षाच्या बालिका,
लेकुरवाळया सुनालेकी,
चाळीशीतल्या आया-बहीणी,
वृद्धत्वाकडे झूकलेल्या...
नाहीत सुटत वखवखलेल्या नजरेतून.
काळ बदलला,
माणसं नाहीत बदलली.
फक्त देह बदलले,
डोकी नाहीत बदलली.
हे माणवेत्तर प्राण्यांनो,
सावध रहा माणूस पिसाटलाय,
स्वतःच्या माद्या सांभाळा.
काळ बदललाय,
हे तुम्हाला ज्ञात नाही.
तुमच्यासाठी कोर्ट असेल,
हे माझ्या तरी ऐकिवात नाही.
----"शेंदराचे देव" मधुन डॉ. सुरज सावंत

Post a Comment

0 Comments