short marathi poem

इफेक्ट देऊन बदलतो फोटोतला लूक,
तशीच बदलली असती पोटातली भूक...
तर....
भागलेल्या भुकेने लागलेल्या भुकेशी
कधीच केला नसता अहंकाराने तंटा....!!
आणि कोणत्याच लेकरांच्या पोटात,
वाजली नसती भातासाठी शाळेतली घंटा..!!

दहावीचं गणिताचं नवनीत
जपून ठेवावं तसाच
मी तिचा रुमाल जपला होता..
शाळेत टाईमपास करता करता
माझ्यातला मितवा 
तेव्हाच दुनियादारी शिकला होता...

कॉलेजचा शेवटचा पेपर संपला
कि आयुष्याची परीक्षा सुरु होते...
..सुमित गुणवंत..

ती बोलली असे काही कि मी मुका झालो...
बुडवली गाथा माझी अन मी तुका झालो...
..सुमित गुणवंत..

आता तिच्या विरोधी पक्षात आहे मी....
तरीही तिच्या मर्जीच्या कक्षात आहे मी....
वगळले मला तिच्या लक्ष्यात नाही मी...
तरीही तिच्या पुसटसा लक्षात आहे मी...
.
.
..सुमित गुणवंत..


Post a Comment

0 Comments